महाराष्ट्राला हादरा देणारी घटना ; टिकटॉक स्टार महिलेचा अल्पवयीन मुलावर बलात्कार

महाराष्ट्राला हादरा देणारी घटना ; टिकटॉक स्टार महिलेचा अल्पवयीन मुलावर बलात्कार

सांगली – जग खूप बदलत चालले आहे. साधारण महिलांवर अत्याचार घडतात पण सांगली जिल्ह्यात एक वेगळंच प्रकरण समोर आले आहे. टिकटॉकवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलावर महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार संशयित महिलेविरोधात पोक्सो काद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. संबंधित महिला ही मुलाला आत्महत्येची धमकी देऊन अत्याचार करत होती. ही तक्रार संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगा मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

…तर आम्हालाही आरक्षण नको केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मोठे विधान

शरद पवार यांच्या भेटीवर महादेव जानकर यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले…

विमानतळ ना LIC विकली असती परंतु हे विकायला शिक्षित लोक जबाबदार आहेत

संबंधित महिलेची आणि अल्पवयीन मुलाची टिकट़ॉकवर ओळख झाली. या दोघांमध्ये संवाद वाढत राहीला. याच गोष्टीचा फायदा घेत महिलेने अल्पवयीन मुलाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यांतर महिलेने मुलाला माधवनगर येथे भेटायला येण्याचा आग्रह केला.

भेटायला न आल्यास आत्महत्या करण्याचीही या महिलेने त्याला धमकी दिली. त्यानंतर मुलगा भेटायला गेल्यानंतर संशयित महिलेने मुलाचे लैंगिक शोषण केली असल्याची माहिती मुलाच्या वडिलांनी दिली आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here