ठाकरे सरकारने ऊसतोड कामगारांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांची केली धरपकड

ठाकरे सरकारने ऊसतोड कामगारांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांची केली धरपकड

वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक ! वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

पुणे । दि.२७ – पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या भाववाढी संदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ऊस कामगार, मुकादम, वाहतूकदार यांच्यासाठी लढा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी व प्रदेश अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अटक केली करून अज्ञात स्थळी नेले.

या बैठकीला विनायक मेटे, भाजपा आमदार सुरेश धस यांनाही निमंत्रण नव्हते, मात्र त्यांना ऐनवेळी प्रवेश देण्यात आला पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठकीला जाण्यापासून रोखण्यात आले.


मोदी सरकारच्या विरोधात “गाव तेथे आंदोलन” पहा कुठे होतंय

भाजप शिवसेना वादात राष्ट्रवादीची उडी; नवाब मलिक म्हणाले शिवसेनेने आपली विचारधारा सोडली…

GST चा हिस्सा मिळाला पाहिजे या शिवसेनेच्या भूमिकेशी सहमत असले तरीही आठवले यांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका


या विरोधात जाब विचारल्यावर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या या हुकूमशाही कृत्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.अशी माहिती वंचितचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here