अर्णब गोस्वामी अडचणीत; ‘या’प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास दिला नकार

अर्णब गोस्वामी अडचणीत; ‘या’प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास दिला नकार

नवी दिल्ली ।। रिपब्लिक टिव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन नकार दिला होता. तर, सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन मंजूर करत त्यांना दिलासा दिला होता.

मात्र, आता अर्णबला दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द करणे आणि तपास सीबीआयकडे वर्ग करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. ही याचिका स्वभावत: महत्वाकांक्षी असल्याचे दिसत असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

प्रियांका गांधींचा नरेंद्र मोदी यांना थेट सवाल; सरकारकडे विमान खरेदी करायला पैसे आहेत पण…

एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करणाराच आला अडचणीत; झाला गुन्हा दाखल

भाजपचे खासदार सनी देओल यांचा पाठिंबा नेमका कोणाला? शेतकऱ्यांना की मोदी सरकारला…

महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये आणि हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करावे अशी आपली मागणी आहे. मात्र ही याचिका मागे घेणेच योग्य असेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली आहे. रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द करण्यात यावेत आणि हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्यात यावे असे याचिकेत म्हटले गेले होते.

या व्यतिरिक्त संपादकीय विभागातील कोणीही, तसेच इतरही कोणत्या कर्मचाऱ्याला अटक होता कामा नये, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिलं आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here