महाराष्टाची लेक दिल्लीत कडाडली! पहिली गोळी मी झेलायला तयार

महाराष्टाची लेक दिल्लीत कडाडली! पहिली गोळी मी झेलायला तयार

नवी दिल्ली – दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळत आहे. मोदी सरकार व शेतकरी आपल्या मुद्द्यावरून मागे हटण्यास तयार नाहीत. “शेतकरी आंदोलना दरम्यान गोळी झेलण्याची वेळ आळी तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची ही मुलगी सर्वात आधी गोळी झेलेल”, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी मोदी सरकार ला दिला आहे.

महाराष्ट्र राज्याने भारत बंदला सर्वाधिक चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवाना सांष्टांग दंडवत करते. मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे मी या आंदोलनाचे समर्थन करते. पंजाब, हरियाणाचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकरी आमचे भाऊ आहेत.

मी सगळ्यांना नमस्कार करते. राजकारण्यांनी आपल्या सगळ्यांना हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा जातींमध्ये वाटून दिलं होतं. मात्र, या आंदोलनाने जगाला दाखवून दिलंकी, न आम्ही हिंदू आहोत, न मुसलमान आहोत, न सीख आहोत, न ईसाई आहोत. आम्ही या देशाचे शेतकरी आहोत, असं पूजा मोरे म्हणाल्या.

विमानतळ ना LIC विकली असती परंतु हे विकायला शिक्षित लोक जबाबदार आहेत

महाराष्ट्राला हादरा देणारी घटना ; टिकटॉक स्टार महिलेचा अल्पवयीन मुलावर बलात्कार

कृषी कायद्यावरून अमित शहा यांचे धक्कादायक विधान म्हणाले कायदा मागे घेणार…

दरम्यान, आज 14 दिवस झाले तरीही या आंदोलनावर तोडगा निघू शकला नाही. आज शेतकरी व मोदी सरकार यांच्यात पुन्हा बैठक होणार आहे. या होणाऱ्या बैठकीकडे सर्व देशाचे लक्ष वेधले गेले आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here