देशाचे नेतृत्व करण्याची धमक फक्त एकाच नेत्यांमध्ये आहे; तो नेता म्हणजे… संजय राऊत
मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी ओळख संजय राऊत यांनी निर्माण केले आहे. यामध्येच यूपीएच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत आलं आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. प्रश्नांची देशाची जाण, लोकांची नाडी, खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहे. तसेच त्यांचा अनुभव दांडगा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
राज्यमंत्री बच्चू कडू यांची पंतप्रधानांवर टीका! म्हणाले, ‘मोदीजी खून लो, मगर….
वेब सिरीजचे चाहते आहात ? तर ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवरील खास ऑफर्स जाणून घ्या !
अरे बापरे ! ‘या’ कारणामुळे उद्या दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडी सेवा बंद ?
यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलायचं झालं तर, शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कस काय याबाबत मत व्यक्त करू?, असं संजय राऊत म्हणालेत.
महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही यूपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही, असं राऊत म्हणाले.