फ्रान्समध्ये सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर; निदर्शनाला हिंसक वळण!

पॅरिस ।। फ्रान्स सरकारने देशात नवीन सुरक्षा कायदा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याविरोधात नागरिकांनी मोठ्या संख्येने विरोध दर्शविला आहे. आज पॅरीसमध्ये या कायद्यांच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या ९५ नागरीकांना अटक करण्यात आली. दरम्यान, निदर्शकांनी हिंसाचारही केला. त्यात सुरक्षा बंदोबस्तास असलेले तब्बल ६५ सुरक्षा रक्षक आणि अधिकारी जखमी झाले आहेत. फ्रेंच राजधानी पॅरिसमध्ये सुमारे ५ हजार लोकांनी निदर्शने केली. फ्रान्सचा बीएफएमटीव्ही शनिवार (दि. ०५ डिसेंबर) रोजी गृह मंत्रालयाने या संदर्भात आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

फ्रान्स सरकारचे नव्याने केलेले कायदे सद्यस्थितीला मंजुरीसाठी संसदेपुढे ठेवण्यात आले आहेत. पण नागरिक त्या कायद्यांना कडाडून विरोध करीत असून दर आठवड्याला देशात या विधेयकांच्या विरोधात नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून हिंसक निदर्शने करीत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येत आहे. संबंधित विधेयकाच्या निषेधार्थ आजपर्यंत ९० मोर्चे काढण्यात आले. या संदर्भात गेराल्ड डार्मनिन ( गृहमंत्री, फ्रान्स) म्हणाले, हिंसक निदर्शनांच्या आरोपाखाली ६४ जणांना अटक करण्यात आंदोलन आली असून त्यापैकी ३० जणांना फ्रेंच राजधानी पॅरिस येथे ताब्यात घेण्यात आले आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here