ठरले तर, एकनाथ खडसे यांच्याकडे सोपविण्यात येणार या मंत्रिपदाचा कार्यभार
जयभीम महाराष्ट्र, मुंबई । एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला असून त्यांच्या कडे महत्त्वाचे खाते देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा सुरू असताना आता मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काही खात्यांची अदलाबदल, तर काही नवीन चेहर्यांचा समावेश करून एखाद्या विद्यमान मंत्र्याला डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांच्याकडे कृषीखात्याची जबाबदारी देण्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादीकडे असलेले गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे जाणार असून त्याबदल्यात शिवसेनेकडे असलेल्या कृषी खात्यासह आणखी एखादे खाते राष्ट्रवादीला दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कामगार नेतेच बनले माफिया; पत्रकारास घरात घुसून मारहाण
दलित आदिवासी सवर्णांसह हिमाचल मध्ये रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार – मा. ना. रामदास आठवले
हाथरस प्रकरण : न्यायालयाने पोलीस व प्रशासनावर ओढले ताशेरे, राज्य सरकारला दिल्या ‘या’ सूचना
या दोन खात्यांसह रोजगार हमी, उत्पादन शुल्क, कामगार, अल्पसंख्यांक कल्याण या खात्यांमध्ये खांदेपालट होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार असल्याची चर्चा असून हे नवे चेहरे कोण असतील याबद्दल अंदाज बांधले जात आहेत. राज्य सरकार अस्थिर असून ते केव्हाही कोसळू शकते, असे भाजपकडून वारंवार सांगितले जात असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खांदेपालट करण्याचा आग्रह धरला आहे.