पदवीधर निवडणूक : उदयनराजे यांच्या भूमिकेने भाजपमध्ये शांतता

  • पदवीधर निवडणूक : उदयनराजे यांच्या भूमिकेने भाजपमध्ये शांतता

सातारा ।। पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले दोन दिवसांपूर्वी भाजपचे पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची भेट घेण्यासाठी येऊनही भेट होऊ शकली नाही. पण काल पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी उदयनराजेंची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी श्री. कोकाटे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे पदवीधरच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्ह्यात पदवीधरच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून दररोज मेळावे, बैठका, मतदारांच्या गाठीभेटी यावर भर दिला आहे. अशातच महाविकास आघाडीचे नेते व भाजपच्या नेत्यांत कलगीतूरे रंगले आहेत. अशाही परिस्थितीत खासदार उदयनराजे भोसले हे मात्र, अद्याप तरी शांतच आहे. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत उदयनराजे अद्यापही प्रचारात दिसत नाहीत. भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख प्रचार दौऱ्यात साताऱ्यात आले होते. मात्र, उदयनराजे भोसले व त्यांची भेट होऊ शकली नाही. केवळ फोनवरून चर्चा झाली होती.

आपला देश संविधानानुसार चालला आहे का ?

रात्री बारा वाजता मुलीच्या खोलीत सापडला तरुण; सकाळी दोघांचा…

महाराष्ट्रात पुन्हा लॉक डाऊन; पहिल्यांदा हे बंद करणार

त्यानंतर आता अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली आहे. या भेटीवेळी उदयनराजे यांनी कोकाटे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ऐकूनच या निवडणुकीत उदयनराजेंची काय भूमिका काय राहणार याबाबत राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here