पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे ‘हे’ दिग्गज खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे ‘हे’ दिग्गज खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

सांगली । भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात आपले चांगले बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या पक्षांतराबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कारण संजयकाका व पडळकर यांच्यातून विस्तवही जात नाही हे सर्वांनाच माहिती आहे. खासदार पाटील यांनी मात्र ही अफवाच असल्याचे सांगत शक्‍यता पक्षांतराची चर्चा फेटाळून लावली आहे.

संजयकाका हे पक्षांतर करणार असल्याचे चर्चा करायला कारणही तसेच आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकताच अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त सांगली जिल्हा दौरा केला होता. यामध्ये आटपाडी, खानापूर, तासगाव, जत आणि मिरज तालुक्‍यात दरेकर फिरले. या दौऱ्याचे नियोजन करण्यात आमदार गोपीचंद पडळकर यांचाच पुढाकार होता. त्यामुळे संजयकाका हे आपसूकच मागच्या हातावर राहिले होते. या संपूर्ण दौऱ्यात संजयकाका यांचे नावही कुठे आले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

लोकसभेला संजयकाका व पडळकर हे दोघे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले होते. आता दोघेही एकाच पक्षात आहेत. सध्या दोघांत उघड संघर्ष नसला तरी एकमेकांच्या मनात राग हा आहेच. दरेकर यांच्या दौऱ्याकडे खासदार पाटील यांनी पाठ फिरवलीहोती कारण नियोजनात ते कुठेही नव्हते. परंतु त्यावेळी संजयकाका हे बाहेरगावी असले तरीही चर्चा ही झालीच. त्यांच्या राष्ट्रवादी जवळीकीचा दाखला देत संजयकाका हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा ही झालीच.


बीडमध्ये पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये उभं राहतंय पर्यायी नेतृत्व; पहा कोण आहे चेहरा

कुठेही गेले तरीही मराठा आरक्षण मिळणारच नाही – ऍड. गुणरत्न सदावर्ते

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ‘त्या’ ट्विट मुळे राजकीय वातावरणात खळबळ


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने सहजासहजी उमेदवारी दिली नाही. त्यावेळी भाजपमधूनच जोरात विरोध झाला होता. असे असले तरीही ते दीड लाखाच्या मताधिक्‍याने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विजयी झाले होते.

तासगाव सहकारी साखर कारखाना खासदार पाटील यांच्या गणपती संघाच्या मालकीचा झाला आहे. त्यात राज्य सरकारने मदत केली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यांनी जिल्हा बॅंकेकडून विकत घेतलेला आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला यशवंत कारखाना यंदा चालू केला जाणार आहे. त्यामुळेच संजयकाकांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जवळीक असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र सध्यातरी यावेळी त्यांनी ही अफवा फेटाळून लावली आहे. परंतु भविष्यात काय घडेल हे सांगता येत नाही.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here