कृषी कायद्यावरून अमित शहा यांचे धक्कादायक विधान म्हणाले कायदा मागे घेणार…

कृषी कायद्यावरून अमित शहा यांचे धक्कादायक विधान म्हणाले कायदा मागे घेणार…

नवी दिल्ली ।। दिल्ली सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन अद्यापही थांबत नसतानाच आता अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री) यांनी कृषी कायद्यांबद्दल एक मोठे विधान केले आहे. काल मंगळवार (दि. ०८ डिसेंबर) शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेनंतर देशातून याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार यांच्या भेटीवर महादेव जानकर यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले…

दरम्यान, या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयावरून आंदोलन तूर्तास चालूच राहील असे चित्र आता निर्माण होत आहे. केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेणार नसल्याचे स्पष्ट असल्याचे या बैठकीत निष्पन्न झाले. यासंदर्भात तसा लेखी प्रस्ताव केंद्र सरकार आज बुधवार (दि. ०९ डिसेंबर) रोजी शेतकऱ्यांना देणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

…तर आम्हालाही आरक्षण नको केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मोठे विधान

यापूर्वीही केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र त्या बैठकांमध्येही कोणताही तोडगा निघाला नव्हता. मात्र, बुधवार (दि. ०९ डिसेंबर) रोजी पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगितले असतानाच ही बैठकही रद्द करण्यात आली असे मुला यांनी सांगितले. आज सिंधू बॉर्डरवर दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. त्या होणाऱ्या बैठकीमध्ये शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे हनन मुला (सचिव, अखिल भारतीय किसान सभा) यांनी स्पष्ट केले आहे.

विमानतळ ना LIC विकली असती परंतु हे विकायला शिक्षित लोक जबाबदार आहेत

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here