हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले, का आगीत तेल ओतत आहेत ते?

मुंबई  ।। केंद्राने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन चालू आहे. यामुळे विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच घेरल्याचे चित्र दिसत असून विरोधी पक्ष नेते भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी हा कृषी कायदा मागे घेणार नसल्याचे वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ (ग्राम विकास मंत्री तथा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी पाटील यांना चांगलाच टोला लगावला आहे. मुश्रीफ म्हणाले, कृषी कायदा मागे घेणार नसल्याचे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काय देशाचे पंतप्रधान व कृषिमंत्री झाले काय? का आगीत तेल ओतत आहेत ते? पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ बोलत होते.

हसन मुश्रीफ यांनी यावेळी खरमरीत शब्दात विरोधकांचा समाचार घेतला. पुढे ते म्हणाले, बाबा आपल्याकडे शेतकऱ्यासाठी अनेक कायदे आहेत, अशा शब्दात शेतकरी महाराष्ट्रात आंदोलन करत नसल्याची टिका करणाऱ्या देवेंद्र फडणीस (विरोधी पक्षनेते) यांना बोलले. यावेळी तुमचे सावता माळी सारखे बाजार गेले कोठे असा सवालही मुश्रीफ यांनी सदा खोत यांना केला.

दिवसभर शेतातील माल काढून शेतकरी तो विकत बसणार नाही. तेआपला माल कुठेही विकू शकतात. यासाठी बाजार समित्या आवश्यक असल्याचे सांगून, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी केवळ मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठीच केंद्र सरकारकडून हा कॉन्ट्रॅक्ट शेतीचा कायदा करण्यात आल्याचा थेट आरोपही मुश्रीफ (ग्राम विकास मंत्री तथा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी यावेळी केला.

केंद्र सरकारने जबरदस्तीने कृषी विधेयक लादल्याने याच विरोधात दिल्ली येथे गेल्या १२ दिवसांपासून हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. स्वतःच्या लंगरमधीलच जेवण ते घेत आहेत. सरकारचा चहासुद्धा या शेतकरी आंदोलकांनी घेतला नाही. शेत पीकांना हमीभावाचा समावेश करावा. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म रद्द करावा तसेच, बाजार समितीचा पूर्ववत समावेश करावा. या प्रमुख तीन मागण्या शेतकऱ्यांच्याकडून होत असून संपूर्ण देशभरासह ब्रिटन, कॅनडामधूनही शेतकर्‍यांच्या या लढ्याला पाठिंबा मिळत आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here