सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण त्वरित द्यावे – रामदास आठवले

मुंबई ।। पदोन्नतीमधील आरक्षण हा मागासवर्गीयांचा अधिकार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून त्यानुसार राज्य सरकारने त्वरित मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांना पदोन्नतीमधील आरक्षण द्यावे असे आवाहन रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय तथा राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष) यांनी केले आहे.

महादेव जानकर महाविकास आघाडीच्या वाटेवर; राष्ट्रवादीच्या नेत्याची घेतली भेट

आझाद मैदान येथे मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे यासाठी हरीभाऊ राठोड (माजी खासदार) यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा आठवले यांनी यावेळी केली. यावेळी बारा बलुतेदार संघटनेचे पदाधिकारी आणि भटके विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते आमरण उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत.

‘या’ नेत्याची भेट घेण्यासाठी शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना

भटक्या विमुक्तांची सामाजिक अवस्था अनुसूचित जाती जमाती पेक्षा दयनीय आहे. त्यामुळे भटक्या विमुक्तांना स्वतंत्र प्रवर्ग करून 10 टक्के आरक्षण द्यावे तसेच त्यांना राजकीय आरक्षण ही द्यावे असे आपले मत असून भटक्या विमुक्तांच्या मागण्यांना आपल्या रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याची घोषणा करून केंद्र सरकार द्वारे भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे व संबंधित रोहिणी आयोगाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी दिले आहे.

शेतकऱ्यांसाठी शरद पवार पुढे सरसावले; तोडगा काढण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची घेणार भेट

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here