शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!! कांदा लगेच विकू नका, यावेळी मिळेल किलोला 100 रु. दर

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!! कांदा लगेच विकू नका, यावेळी मिळेल किलोला 100 रु. दर

जयभीम महाराष्ट्र । कांदा महागला की ग्राहकांना रडवतो, परंतु त्याचवेळी दलालांना आनंद होत असतो. कारण कांद्याची कमी किंमतीत खरेदी करून दलाल त्याचा साठा निर्माण करतो व ऐन महागाई च्या काळात तो कांदा बाहेर काढतो. व शेतकरी हताश होऊन फक्त त्या वाढलेल्या दराकडे बघत असतो. आता असे करू नका. कारण ऐन दिवाळीत कांदा महाग होण्याची शक्यता आहे.

कांदा सद्यस्थितीत ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाळी कांद्याचे पीक जळाल्याने कांद्याची आवक घटणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत हे दर दुप्पट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव येथील कांद्याच्या बाजारात सद्यस्थितीत कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा ठोक भाव मिळत आहे. अमरावती येथील मंडईत तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने ठोक विक्री होत आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये कांद्याला उच्चतम दर मिळाले होते. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी कांद्याच्या दरात एवढी तेजी आली आहे.


सुशांतसिंगच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण; शरीरात आढळले विष, भारतीय जनता पक्षाने खेळला हा डाव?

भाजपा मधील ओबीसी नेते चूप का आहेत ? ओबीसी नेत्यांवर लोकजागर पार्टीचा घणाघाती आरोप; मात्र यांचे केले अभिनंदन

मराठा आरक्षणावरून दोन्ही राजांवर शरद पवार यांचा हल्ला म्हणाले मराठा आरक्षण तुम्ही…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोशल मीडियावर होत आहेत ट्रोल; कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या


सध्या येथील मंडईत कांद्याची ७०० ते ८०० कट्टे आवक होत असून, ३० ते ५० रुपये दराने विक्री होत असल्याचे माहिती व्यापारी सतीश कावरे यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून जिल्ह्यात कांद्याची आवक सुरू आहे. यंदा सलग पावसामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी ७५ टक्के रोपी जळाल्यामुळे कांद्याचे केवळ २५ टक्के उत्पादन होणार आहे. ते इतरत्र निर्यात होणार नाही. त्यामुळे यंदा कादा टंचाईची शक्यता पाहता शासनाने निर्यातबंदी केली.


बातम्या व लेख प्रसिद्ध करण्यासाठी 9960740420 या whatsapp क्रमांकावर पाठवा

उत्कृष्ट लेख व बातम्या वाचण्यासाठी 9960740420 हा whatsapp क्रमांक आपल्या ग्रुपला जोडा

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here