मुंबई ।। केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयक बिलाला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला जुमानत नसल्याने शेतकऱ्यांच्यावतीने आज ‘भारत बंद’ पुकारण्यात आला होता. या बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करताना हा बंद शांततेने पार पाडावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ ‘संभाजी ब्रिगेड’ मैदानात !
केंद्र सरकारने तीन कृषीविषयक बिल पास केले असून हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्याला पंजाब, हरियाणा मधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. गेल्या १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात केली आहे. मात्र, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंद पुकारला होता.
हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले, का आगीत तेल ओतत आहेत ते?
या बंदला देशातील २० विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असून राज्यात वंचित बहुजन आघाडीने या बंदला पाठिंबा दिला असल्याचे प्रकाश आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) यांनी सांगितले होते. राज्यात कार्यकर्त्यांनी बंद करण्यासाठी आंदोलन करावे. तसेच, आंदोलन शांततेत करावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.