मुंबई ।। आज मुंबईतील यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान येथे शरद पवार (अध्यक्ष, राष्टवादी काँग्रेस) यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी पवार म्हणाले, ‘शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारी नवी पिढी घडवणे हे आजच्या घडीचे सर्वात मोठे आव्हान’ आहे. तसेच, ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो त्याचे स्मरण करणे आवश्यक आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा निव्वळ उल्लेख करुन चालणार नाही तर त्यांच्या विचाराच्या दृष्टीने आपण गेले पाहिजे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाची कास धरत समाज घडवण्यासाठी आपले आयुष्य वेचले, आपण सगळ्यांनी याच मार्गावर चालत समाजकारण करायला हवे, असेही ते म्हणाले. आजपर्यंत दिलेल्या सहकार्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
कोरोना लस देण्याचे प्राधान्यक्रम निश्चित; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती !
पुढे पवार म्हणाले, स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये त्यावेळच्या गांधी – नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचे सूत्र माझ्या आईने स्वीकारल्याने ते काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कटाक्षाने पाळली पाहिजे, ही भूमिका देखील आयुष्यभर निभावली. याचा लाभ म्हणून आम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लाभला आहे.