विधिमंडळाच्या २ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात !

मुंबई ।। राज्य विधिमंडळाच्या २ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला उद्या सोमवार (दि. १४ डिसेंबर) पासून सुरुवात होणार आहे. या वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच पार पडणार आहे. दरम्यान, पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी अधिवेशन असणार असून मराठा आरक्षण, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना करण्यात येणारी मदत, वाढीव वीज बिले आदी विषय यावेळी गाजण्याची चिन्हे आहेत.

अखेर महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याला सर्वप्रथम कोरोनामुक्त होण्याचा मान !

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गाजत असल्याने हा मुद्दा विरोधक उपस्थित करण्याची शक्यता आहे. मात्र, ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्षनेते सोडणार नाहीत. अधिवेशनात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटण्याचे चित्र तयार झाल्याने भाजपची कोंडी करण्याकरिता कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कृषी कायदांचा मुद्दा तापविण्याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच यापूर्वी कृषी धोरणांना कसा पाठिंबा दिला होता, याकडे भाजपचे नेते लक्ष वेधतील. तसेच, मोफत वीज आणि वाढीव वीज बिलांचा मुद्दाही विरोधकांकडून मांडण्यात येणार आहे.

आजपासून केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा राज्यव्यापी दौरा सुरू !

त्याचबरोबर महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’ हा कायदा करण्यात येणार आहे. या कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या संदर्भातील विधेयक अधिवेशनात सादर केले जाईल. या कायद्यात आरोपीला मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

‘या’ मंत्र्याच्या निवासस्थानाकडे निघालेला मोर्चा अडवला !

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here