राज्य शासनाचा नवा निर्णय : रंगबिरंगी नक्षीकाम असलेल्या पोशाखास बंदी; ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास… – रामदास आठवले

मुंबई ।। नुकतेच राज्य सरकारने शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या पोशाखासंबंधी नवा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी कसा पोशाख घालावा यावर बंधन येणार असून यामध्ये विचित्र नक्षीकाम असलेले कपडे, जीन्स, टी-शर्ट घालण्यास सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदी घालण्यात आली असून या संबंधी खास मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय तथा राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड) यांनी म्हटले, ‘राज्य सरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी – अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल ?’ असा थेट प्रश्नच आठवलेंनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्रात महिला सुरक्षिततेसाठी आणण्यात येणारा ‘शक्ती कायदा’ नेमका काय? काही प्रतिक्रियांसह

या सरकारी परिपत्रकात असे नमूद केले आहे की, महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार किंवा चुडीदार कुर्ता, पॅन्ट, ट्राउझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच, आवश्यकता असल्यास दुपट्टा घालावा. त्याचबरोबर पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट किंवा ट्राउझर पॅन्ट असा पेहराव करावा. मात्र, गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम तथा चित्रे असलेले कपडे परिधान करण्याचे टाळावे. आठवड्यातील एक दिवस शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीन्स आणि टी शर्टचा वापर कार्यालयामध्ये करु नये.

‘शरद पवार’ यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत ‘ठाकरे सरकार’ म्हणाले, शरद पवार यांचे पुढील आयुष्य….

हा परिधान केलेला पोशाख स्वच्छ व नीटनेटका असावा. तसेच, कार्यलयीन वेळेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विहीत नमुन्यातील कार्यलयीन ओळख पत्र दर्शनी भागावर धारण करावे. महिलांनी कार्यालयामध्ये चपला, सॅन्डल, बूट तसेच, पुरुषांनी बूट सॅन्डल याचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्स चा वापर करू नये. कंत्राटी तत्वावर कार्यालयात नियुक्त केल्या जाणाऱ्या कर्मचारी व सल्लागार, शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्तींनाही हे नियम लागू राहणार असल्याचा या परिपत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे.

आजपासून केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा राज्यव्यापी दौरा सुरू !

 

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here