मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर !

औरंगाबाद ।। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शनिवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी औरंगाबाद जिल्ह्याचा दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन तसेच, विविध विकास कामांचा होणार शुभारंभ आहे.

आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पोशाखावर असणार ‘ही’ बंधने; ठाकरे सरकारचा नवा निर्णय !

त्याचबरोबर या विकासकामांमध्ये १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, १४७ कोटींचे सफारी पार्क, १५३ कोटींचे रस्ते व २३ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा यात समावेश आहे. दुपारनंतर कार्यक्रम भागातील रस्ते सुद्धा बंद करण्यात येणार असून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत आस्तिक कुमार पांड्ये (आयुक्त, औरंगाबाद महापालिका) यांनी माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी महापालिकेकडून ठिक – ठिकाणी स्क्रीन्स लावल्या जाणार आहेत.

कोरोना लस देण्याचे प्राधान्यक्रम निश्चित; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती !

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here