माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या ‘गव्याची’ माफी मागणारे बॅनर; पुणेकरांनी व्यक्त केल्या भावना !

पुण्याच्या रस्त्यावर रान गव्याची प्रतिकृती !

गिरीश मुरुडकर यांची संवेदनशीलता

पुणे ।। माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर पुण्याच्या रस्त्यावर लागले असून पुणे येथील रस्त्यांवर रान गव्याची प्रतिकृती उभारली आहे. मुरुडकर झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश मुरुडकर यांच्या उपक्रमातून पुणेकरांची संवेदशीलता व्यक्त झाली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांची पंतप्रधानांवर टीका! म्हणाले, ‘मोदीजी खून लो, मगर….

गिरीश मुरुडकर (अध्यक्ष, भारत फ्लॅग फाउंडेशन) यांनी मुरुडकर झेंडेवाले या पासोड्या विठोबाजवळील दुकानात ही प्रतिकृती उभारली. ‘घटनेचे गांभीर्य ओळखुया, निसर्गात ढवळाढवळ थांबवूया’ असा शोकसंतप्त संदेश भारत फ्लॅग फाउंडेशन ने या प्रतिकृती जवळ लावला आहे. पुणेकरांची नजरा ही प्रतिकृती वेधून घेत आहे.

‘या’ भाजप आमदाराचे ‘ठाकरे सरकार’ला खुले आव्हान ! म्हणाले, ‘जयंतराव’ भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या….

काल बुधवारी (०९ डिसेंबर) रोजी कोथरूडमध्ये रान गव्याने माणसांच्या गर्दीला, पाठलागाला घाबरून प्राण गमावल्यावर हळहळ व्यक्त झाली होती. आज ‘आम्हाला माफ कर ,आम्ही तुझे गुन्हेगार आहोत’ असे शब्द लिहिलेले बॅनर लावून मुरुडकर यांनी पुणेकरांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘जंगले राखुया, वन्यजीव जगवूया’ असा संदेशही मुरुडकर यांनी प्रतिकृती जवळ लिहिला आहे.

कृषी कायद्यावरून अमित शहा यांचे धक्कादायक विधान म्हणाले कायदा मागे घेणार…

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here