मंत्रीपद गेले तरी चालेल पण अशा पद्धतीने मराठा आरक्षण होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार

मंत्रीपद गेले तरी चालेल पण अशा पद्धतीने मराठा आरक्षण होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार

जालना ।। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा आरक्षणावरूवन राज्यात वातावरण तापलं आहे. मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही मराठा नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावे असे म्हटले आहे. तर काहीजण वेगळं आरक्षण मागत आहेत. अशातच मंत्रिपद गेलं तरी चालेल पण ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू, असं मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. जालनामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

शेतकरी आंदोलन पोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर; संयुक्त राष्ट्राने मोदी सरकारचे कान टोचले म्हणाले…

हिंदू महासभेचे नेते बाबासाहेबांना भेटून म्हणाले, ‘राष्ट्रध्वज भगव्या रंगाचा करा’ त्यावर बाबासाहेब म्हणाले..

महाराष्ट्र सरकार कोसळणार; काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिली माहिती

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाचा ओबीसी त समावेश करण्यात येऊ नये अशी मागणी ओबीसी संघटना बरोबर च राजकीय नेत्यांनी केली आहे. ओबीसी नेते व संघटना म्हणत आहेत की, आम्ही मराठा समाजासाठी पुर्ण ताकदीने उभे राहू. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा जर काही प्रयत्न झाला तर माझे मंत्रिपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here