भारत बंद : ‘या’ राज्याच्या मंत्र्यांचा उद्या ‘राज्य बंद’ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा !

अहमदाबाद ।। केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध शेतकरी संघटनांकडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतामध्ये ‘बंद’ पुकारण्यात आला. मात्र, याला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी अपवाद ठरत असल्याचे चित्र आता तयार झाले. एका बाजूला शेतकरी आंदोलनाला व भारत बंदला सर्व क्षेत्रातून पाठिंबा मिळत असतानाच रुपाणी यांनी गुजरात बंद ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. याबद्दल रुपाणी म्हणाले, उद्या मंगळवार (दि. ०८ डिसेंबर) रोजी गुजरातमध्ये बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा थेट इशाराच विजय रुपाणी यांनी दिला आहे. ते अहमदाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

त्याचबरोबर विरोधकांवर आरोप लावत रुपाणी पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या नावावर विरोधक ‘भारत बंद’ आंदोलन करत असून नाव मात्र शेतकऱ्यांचे घेत आहेत. तसेच, विरोधकांना आपलं अस्तित्व टिकवायचे असल्याने त्यांची धडपड सुरू आहे. अशा शब्दात रुपाणी यांनी विरोधकांवर टीक केली आहे.

जे लोक गुजरातमध्ये जबरदस्ती बंद पुकारण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासह राज्यात कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्यासाठीही सरकार विशेष प्रयत्न करणार आहे, असे विजय रुपाणी यांनी सांगितले आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here