भारत बंदच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेचा पेपर ढकलला पुढे ? याबद्दल जाणून घेऊया !

पुणे ।। चार्टर्ड अकाऊंटन्ट्स फॉऊंडेशन परीक्षेच्या पेपर-१ च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. येत्या मंगळवारी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला असून, ‘प्रिंसिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटिंगचा पेपर’ मंगळवार (दि. ८ डिसेंबर २०२०) ऐवजी १३ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. परीक्षेची वेळ व ठिकाणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

परीक्षेच्या तारखेत बदल झाला असला, तरी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले जुनेच परीक्षा प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. उर्वरित परीक्षा नियोजित वेळापत्रकारप्रमाणे होणार असून उमेदवारांनी वरील बाबी लक्षात घ्याव्यात. तसेच, काही प्रश्न व शंका असल्यास संस्थेच्या www.icai.org या वेबसाइटला भेट द्यावी, असे दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी सांगितले आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here