भाजपच्या कोरोना लसीवर अविश्वास; मी लस टोचून घेणार नाही

भाजपच्या कोरोना लसीवर अविश्वास; मी लस टोचून घेणार नाही

लखनौ ।। देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम आज यशस्वीरीत्या पार पडल्याने यंत्रणा पुढील मुख्य लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष लसीकरणाआधीच वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कोरोनाच्या लशीवर अविश्वास दाखवला आहे.

राज्य शासनाचा नवा निर्णय : रंगबिरंगी नक्षीकाम असलेल्या पोशाखास बंदी; ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास… – रामदास आठवले

…तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लॉकडाऊन काळातील समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ अदा करावे.

राजधानी दिल्लीत तीन ठिकाणी ही रंगीत तालीम पार पडली. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शहरातील लोकांना ही लस मोफत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. ही लस सर्वांपर्यंत पोचावी म्हणून सर्वच राज्यांनी कंबर कसली आहे. रंगीत तालमीसाठी मुद्दाम दुर्गम भागांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातने चार जिल्ह्यांमध्ये, कर्नाटक आणि तमिळनाडूने पाच जिल्ह्यांत, राजस्थानातील सात जिल्ह्यांमध्ये ही रंगीत तालीम झाली.

रंगीत तालीम सुरू असतानाच प्रत्यक्षातील कोरोना लशीबद्दल अविश्वास दाखवून अखिलेश यादव यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे देशात आतापर्यंत दीड लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भाजपकडून दिल्या जाणाऱ्या लशीवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? आम्ही भाजपची लस टोचून घेणार नाही. मात्र, 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही सर्वांना मोफत कोरोना लस देऊ.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here