फुफ्फुसाला कशाप्रकारे पोखरतो कोरोना ? जाणून घ्या काय म्हणाले वैज्ञानिक….

मुंबई ।। कोरोना विषाणूच्या विळख्यात एकदा व्यक्ती अडकला की, त्याचा परिणाम सर्वात जास्त फुफ्फुसांवर होतो. त्यामुळे श्वसनास त्रास होणे, थकवा येणे, दम लागणे अशा लक्षणांना शरीराला तोंड द्यावे लागते. याच संदर्भात वैज्ञानिकांनी महत्त्वाच्या माहितीचा शोध लावला आहे. या माहितीमुळे कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यास चांगली मदत होणार असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला. वैज्ञानिकांच्या या संशोधनाबात ‘मॉलिक्युलर सेल्स’ या नियतकालिकेत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

…तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कोरोनामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये बदल होतो. प्रथिनांच्या प्रमाणात असामान्य बदल होऊन या पेशींमध्ये प्रथिनांच्या फॉस्फोरिलेशनचे प्रमाण वाढते. हे असामान्य बदल आहेत. याशिवाय यामुळे विषाणूंची संख्या वाढवण्यास मदत होते. कालांतराने विषाणू पेशी नष्ट करतात. त्यामुळे फुफ्फुसाला इजा होते, असे वैज्ञानिकांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर पेशींच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो.

भाजपच्या ‘या’ आमदाराची शिवसेनेवर टीका; म्हणाले, तर, पवार कधी शिवसेनेला…

दरम्यान, वैज्ञानिकांनी कोरोना संसर्ग झाल्यानंतर पहिल्या २४ तासांत फुफ्फुसांच्या पेशींमध्ये काय परिणाम होतो? याचे निरीक्षण केले. संसर्गानंतर पहिल्या एक, तीन आणि सहा तासांनी काय होते? याचा अभ्यास संशोधकांनी केला. संशोधनात कोरोनाबाधित रुग्णाच्या फुफ्फुसांच्या पेशींमध्ये हजारो प्रथिने आणि फॉस्फोरिलेशन इव्हेंट्समध्ये नाट्यमय बदल दिसल्याचे डेरेल कॉटन (प्राध्यापक, बसएम डॅरेल कॉटनयेथील पॅथॉलॉजी) यांनी सांगितले. पूर्वी अस्तित्वात असलेली किमान १८ क्लीनकिल औषधे शोधून काढली, जी मुळात इतर आजार बरे करण्यासाठी विकसित करण्यात आली होती. यावेळी संशोधनकांनी या औषधांवरही अभ्यास केला.

अखेर महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याला सर्वप्रथम कोरोनामुक्त होण्याचा मान !

वैज्ञानिकांच्या या संशोधनाला मोठे यश आल्याचे बोलले जात आहे. कारण यामुळे खराब झालेल्या फुफ्फुसांना ठीक करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे. या अभ्यासात स्पेक्ट्रोमेट्री तंत्रांचा वापर करून मानवी फुफ्फुसाच्या ‘एअर बॉसेस’च्या अभियांत्रिकी पेशींचे मूल्यांकन करण्यात आले. या संशोधनाच्या आधारे अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या (बसएम) शास्त्रज्ञांनी फुफ्फुसांच्या पेशींमधील प्रथिने आणि रेणूंचे मार्ग ओळखले, ज्यांचे प्रमाण कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर बदलले.

माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी योजनेची चौकशी सुरु !

या अभ्यासामुळे कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यास चांगली मदत होईल, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. कोरोनाची लागण झाल्यास रुग्णाच्या फुफ्फुसांच्या पेशींमध्ये “फॉस्फोरिलेशन” नावाच्या प्रथिनांमध्ये लक्षणीय बदल होतो, असे संशोधकांचे मत असून पेशींमधील प्रथिनांच्या कार्यात प्रथिनांचे फॉस्फोरिलेशन हे महत्त्वाची भूमिका बजावते. निरोगी पेशींच्या बाबतीत प्रथिने आणि प्रथिनांचे फॉस्फोरिलेशन हे सहसा अत्यंत नियंत्रणात असतात, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे.

अखेर महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याला सर्वप्रथम कोरोनामुक्त होण्याचा मान !

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here