प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यात चुकीचे काही वाटत नाही : छ. संभाजी राजे
जयभीम महाराष्ट्र । काल पुणे येथे ऍड प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी दोन्ही राजांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, लोकशाही मध्ये टीका करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर त्यांनी हे ही सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर व छ.शाहू महाराज यांच्या मध्ये खूप चांगले संबंध होते. दोघांनीही बहुजन समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवला आहे.
सविस्तर माहिती अशी आहे की, वंचित बहुजन आघाडीचे प्रनेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी एक राजा बिनडोक आहे. आणि दुसऱ्या राजाची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट नाही अशी खोचक टीका केली होती. या टीकेमुळे संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद पहायला मिळाले. राज्यभरातुन मराठा समाजाने आंबेडकरांविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया देत व निषेध करत असतांनाच प्रकाश आंबेडकर काहीही चुकीचे बोलले नसल्याची प्रतिक्रिया खा. संभाजी राजे भोसले यांनी दिली आहे. त्यामुळे आज दिवसभरापासून उफाळून आलेला हा वाद आता मिटण्याची शक्यता आहे.
हाथरस गँगरेप : पीडित तरुणीची न्यायालयात बाजू मांडणार हे वकील
या अटींवर मराठा आरक्षणाच्या बंदला वंचितचा पाठिंबा – ॲड. प्रकाश आंबेडकर
खा.संभाजी राजेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहु महाराज यांचे चांगले संबंध होते. प्रकाश आंबेडकर हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असून ते जे काही माझ्याबद्दल बोलले ते चुकीचे बोलले नाहीत असा खुलासा खा. संभाजी राजे यांनी केला आहे. माझ्याबद्दल ते काहीही उलट सुलट बोलले नसून आमच्या बंधूंवर त्यांनी केलेले वक्तव्य हे अशोभनीय आहे. मला मनापासून ते आवडलेलं नाही. यापूढे त्यांनी असे बोलू नये.शेवटी लोकशाही आहे. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे.असेही ते यावेळी म्हणाले.