पुण्यातील ‘या’ ठिकाणच्या बाधित झोपडपट्टी धारकांच्या मुलांना नोकरी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील ‘या’ ठिकाणच्या बाधित झोपडपट्टी धारकांच्या मुलांना नोकरी देण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जयभीम महाराष्ट्र, पुणे । पुण्यात मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्या संदर्भात अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना झोपडपट्टी पुनर्वसन संबंधात काही सूचना केल्या आहेत. त्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झोपडपट्टी धारकांच्या मुलांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून द्याव्यात व त्या मुलांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना आतापासूनच प्रशिक्षण देण्यात यावे अशी सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


ऍड प्रकाश आंबेडकर यांनी RSS चे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर पुन्हा साधला निशाणा म्हणाले…

पुन्हा एकदा उत्तरप्रदेशात सामूहिक अत्याचार करून खून झालेल्या पीडितेचा मृतदेह पोलिसांनी जाळला

टीआरपी घोटाळा : या कंपनीच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी; एकास पोलीस कोठडी व त्याची बँक खातीही गोठवली


पुण्यातील दोन्ही मेट्रो मार्गाचे बाधित झोपडपट्टी धारकांना आराखडा दाखवून त्यांच्या सोयीस्कर ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. त्याचबरोबर अन्य कोणत्याही ठिकाणी त्यांचे पुनर्वसन झाल्यास त्यांना पीएमपीएमपीएल मार्फत मोफत पास देण्यात येतील का? याची शक्यता पडताळून पहावी अशी सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here