…तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नागपूर ।। विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे शिवसेनकडून नेते संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार असल्याचे म्हटले असतानाच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

विधिमंडळाच्या २ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात !

मुंबई महापालिका निवडणुक भाजप आणि आम्ही एकत्र लढणार आहोत. त्यामुळे ही महापालिका निवडणुक जिंकल्याशिवाय राहणार नसल्याचे आठवलेंनी सांगितले नागपुरमध्ये ते बोलत होते.

अखेर महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याला सर्वप्रथम कोरोनामुक्त होण्याचा मान !

शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील मात्र, काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर आम्ही निवडणूक जिंकलो तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा असेल. दरम्यान, राज्यात पक्ष विस्ताराचे काम सुरु असून जिथे शक्य असेल तिथे आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसोबत युती करणार आहोत. भाजपने आम्हाला जागा द्याव्यात, अशी मागणीही आठवलेंनी यावेळी केली आहे.

महाराष्ट्रात महिला सुरक्षिततेसाठी आणण्यात येणारा ‘शक्ती कायदा’ नेमका काय? काही प्रतिक्रियांसह

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here