मुंबई ।। भारतातील लोकप्रिय व्यक्तिमत्वासह भारताचा माजी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने क्रिकेट विश्वातून संन्यास घेतला आहे. मात्र, सध्या तो एका वेगळ्याच क्षेत्रातील उद्योगात व्यस्त आहे. दरम्यान धोनी शेतीत त्याचे मन रमवत असून त्याच्या शेतीतील पिकांना रांची येथील भाजी बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. यामध्ये वाटाणा आणि टोमॅटोनंतर धोनीच्या शेतातील ‘ऑरगॅनिक कोबी’ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
1 लाख 10 हजार रुपयांची अवैध दारूची तस्करी करताना एकास अटक
धुर्वा येथील सेम्बो फार्म मध्ये तीन वर्षांपूर्वी धोनीने शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली आहे. सद्यस्थितीला या ठिकाणी प्रचंड भाज्या आणि दुधाचे उत्पादन होते. ईजा फार्म या नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनाची विक्री होते. काही दिवसांपूर्वीच येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरु झाली असून ‘ऑरगॅनिक कोबी’ला रांचीच्या बाजारात मागणी आहे. या ऑरगॅनिक कोबीच्या उत्पादनासाठी बर्मी कंपोस्ट आणि शेणखताचा वापर करण्यात आला.
‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे सूचक विधान;म्हणाले दुसरी लाट… ?
धोनीने दूध डेअरीसाठी सहीवाल जातीच्या गाई विकत घेतल्या आहेत. तसेच, मत्सोद्योगात, बदक पालन आणि पोल्ट्री फार्ममध्ये देखील धोनीने गुंतवणूक केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता महेंद्रसिंह धोनी कडकनाथ कोंबड्यांची विक्री करेल. त्यासाठी त्याने मध्य प्रदेश येथील झाबुआमधील कडकनाथच्या २ हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत आदिवासी शेतकऱ्याला सांगितलेही आहे.
बाळासाहेब थोरात यांचे मोठे विधान; म्हणाले शरद पवार यांची ‘ही’ चूकच