आजपासून केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा राज्यव्यापी दौरा सुरू !

रिपब्लिकन पक्षाच्या विभागीय बैठकांना मार्गदर्शन करणार

मुंबई ।। राज्यात आगामी वर्षभरात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबई – नागपूरसारख्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची कामगिरी चांगली होण्यासाठी, राज्यात रिपब्लिकन पक्षाच्या झालेल्या सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आणि पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी रामदास आठवले (केंद्रीय राज्य मंत्री, सामाजिक न्याय तथा राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष) यांनी राज्यात विभागनिहाय दौरा सुरू केला आहे. आज रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची बैठक घेतल्यानंतर उद्या रविवार (दि. १३ डिसेंबर) रोजी दुपारी १ वाजता नागपूरच्या सामाजिक न्याय भवन येथे रिपब्लिकन पक्षाच्या विदर्भ विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आझाद विदर्भ सेना या संघटनेचे रिपब्लिकन पक्षात विलिनीकरण करण्यात येणार असून आशिष कुमार बुराडे (प्रमुख, आझाद विदर्भ सेना) यांनी रिपाइंमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर !

रिपब्लिकन पक्षाच्या बैठकांचा आढावा –

मुंबई, नागपूर नंतर रिपाइंच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग बैठक पुणे येथे रविवार (दि. २७ डिसेंबर) रोजी आयोजित करण्यात आली. उत्तर महाराष्ट्राची बैठक शिर्डी येथे सोमवार (दि. २८ डिसेंबर) रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर रिपाइंच्या मराठावाडा विभागाची बैठक औरंगाबाद येथे मंगळवार (दि. २९ डिसेंबर) रोजी घेण्यात येणार आहे. कोकण विभागाची बैठक पनवेल येथे बुधवार ( दि. ३० डिसेंबर) रोजी घेण्यात येणार आहे. ठाणे प्रदेशची बैठक रविवार (दि. ०३ जानेवारी) रोजी सायलंट रिसॉर्ट मनोर पालघर येथे घेण्यात येणार आहे. या सर्व विभागीय बैठकांना रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री) मार्गदर्शन करणार आहेत.

‘शरद पवार’ यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत ‘ठाकरे सरकार’ म्हणाले, शरद पवार यांचे पुढील आयुष्य….

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here