अरे बापरे ! या कारणामुळे विरोधकांच्या विळख्यात सापडणार ‘मोदी’ सरकार ?

मुंबई ।। मोदी सरकारच्या तीन नवीन शेती कायद्यांविरोधात देशभरातील वेगवगेळ्या राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे पडसाद सर्वत्र पसरत असल्याने शेतकऱ्यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच असून केंद्र सरकार शेतकरी संघटनांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. परंतु, देशातील विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शविला. यामुळेच केंद्रातील मोदी सरकार विरोधकांच्या विळख्यात चांगलेच सापडणार असल्याचे चित्र आता तयार झाले आहे. या अनुषंगाने शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) येत्या बुधवारी (दि. ९ डिसेंबर) रोजी रामनाथ कोविंद (राष्ट्रपती) यांची भेट घेणार आहे. तसेच, शरद पवारांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ देखील राष्ट्रपतींना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलनात शेतकरी संघटनांच्या सरकारशी होणाऱ्या चर्चासत्रात काहीही निष्पन्न न झाल्याने शेतकरी संघटना अद्यापही त्यांच्या कायदा पूर्णपणे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. देशातील सगळ्या क्षेत्रातून आंदोलनाला पाठिंबा मिळत असून आता विरोधी पक्षही राष्ट्रपतींकडे शेतकर्‍यांची बाजू मांडण्यात येणार आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारने आडमूठेपणा न दाखवता आता शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांनी मोदी सरकारला दिला आहे. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही, असा इशारही पवार यांनी केंद्र सरकारला दिला.

पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठे योगदान असून या राज्यातील शेतकऱ्यांकडून पिकवला जाणारा गहू आणि तांदूळ केवळ देशातच नाही तर इतर १७ ते १८ देशांना निर्यात केला जातो. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी”, अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here